गणपतीच्या आरत्या
शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५
Click here
to watch the Ganpati Aarti on YouTube from Marathi movie Rama Madhav.
Sukhaharta Dukhaharta by Lata Mangeshkar
.
Ganpati Aarti Colors
Ganaraj Rangi Nachato
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५
हिंगोलीतल्या गणपतीच्या आरत्या
1.
गण्या गण्या गणपती १
गण्या गण्या गम्पती
,
चाळीस कंबळ झळकती।
येक कमळ तूटलं
,
शिवालं जाऊन वाह्यलं।
शिवानं देली ढवळी गाय
,
तिचं दूध गम्पती खाय।
उरलं सुरलं मास्तर खाय
,
खापरं मापरं पोरं खाय।
येक पोरगं चुकलं
,
छडी खाली वपलं।
छडी लागे छम छम
,
विद्या येई घम घम।
विद्येत पडली सावली
,
तीच आम्हालं पावली।
मावलीच्या घरात जाऊन
,
सकाळं उठून शाळेत जाऊ।
दुपार झाली ज्यवाय येऊ। संध्याकाळ झाली प्रार्थना करू।
चुकली मुकली गालात खाऊ।
चार पुरचा येक गणपती मंगलमूर्ती मोरया॥
2.
गण्या गण्या गणपती 2
गण्या गण्या गम्पती
,
चाळीस कंबळ झळकती।
झळकतीच्या पाट्या
,
एकेवीसं रोट्या।
हांडा हांडा भात
,
तबक तबक सातं।
आमचा गना जेवीतो
,
चिकन सुपारी चावीतो।
चावलीचा शितोडा
,
तुळशीमागे मोगरा।
मोगर्याच्या जाळ्या
,
एकेक जाळी जाळीतो।
नागर घंटा वाजीतो
,
शेषे नाग डोलीतो।
चार पुरचा येक गणपती मंगलमूर्ती मोरया॥
3. येकं येकं येक
येकं येकं येकं
,
पह्यल्या गन्याचे मोकं।
बे बे चार
,
विद्या येई पारं।
तीन त्रिक नऊ
,
आमचा गम्पती जेऊ।
चार चोक सोळा
,
आमचा गम्पती भोळा।
पाचा पाचा पंचेवीस
,
लाडू केले एकेवीस।
सहा सहा छत्तीस
,
पावला गनपती।
साती साती येकोनपन्नास
,
विद्या आली बापन्नास।
आठी आठी चौसष्ट
,
रुपये मोजले अडुसष्ट।
नऊ नऊ एक्यानशी
,
गम्पती बाप्पा बेआनशी।
दाहो दाहो शंभर
,
गम्पती आमचा डिगांबर॥
4. संध्याकाळचा दीवा
संध्याकाळचा दीवा
,
लक्षुमीचा एवा।
आमचा नमस्कार सदाशिवा
,
सद्दशिवा पार्वती।
गंगेते भागीरथी
,
बाप माझा गनपती।
माय माझी सरस्वती
,
विद्या देतो गनपती।
चार पुरचा येक गनपती मंगलमूर्ती मोरया॥
5. खंडोबाची आरती
शून्य शून्य शून्य
,
आमचं काही नाही।
माळावरचा खंडोबा
,
खंडोबाची आरती।
खोबर्याची वाटी
,
लोंगचा दीवा।
चार पुरचा येक गनपती मंगलमूर्ती मोरया॥
6. धामणबाईचा गम्पती
अलिकुन गोटा पलीकुन गोटा।
धामणबाईचा गम्पती मोठा।
तेलणबाई तेल दे।
येक पत्ता वाकडा
,
छत्तीस घोडे माकडा।
येक घोडे पे दिल्ली चो
,
ऊपर बैठे मियाराम।
मियाराम की लायलनछुरी
,
चरचर कापे जमुनापुरी।
जमुनापुरच्या आया माया।
जेजुरीच्या पाया पडा।
हातपाय जोडून विद्या मांगा।
चार पुरचा येक गनपती मंगलमूर्ती मोरया॥
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)